कामशेत (ता. मावळ) येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सुपर वॉरियर्स आणि बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी दिनेश शर्मा यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच, ‘ज्यांनी राम मंदिर निर्माण कार्यास विरोध केला, ज्यांनी 370 कलम हटविण्यास विरोध केला, अशा काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीतून हद्दपार करावे व विकसित भारतासाठी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे,’ अशा सूचना शर्मा यांनी केल्या. ( Maval Lok Sabha Mahayuti Candidate Shrirang Barane BJP Meeting in presence of Dinesh Sharma )
यावेळी त्यांनी मावळ विधानसभा कोअर कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मावळ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. तसेच महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांशी समन्वय ठेवून कार्य करण्याच्या सूचना दिल्या. ‘श्रीरंग बारणे यांना मावळ विधानसभा मतदार संघातून 50 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून देऊ,’ असे आश्वासन यावेळी बोलताना भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिले.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha
– वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर, शहर अध्यक्षपदी ‘यांना’ संधी । Vadgaon Maval
– शिरगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार । Maval Crime