मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पिंपरी येथे शिवसेना उबाठा पक्षाचे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी संजय राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. वाघेरे यांनी तसे पाठिंब्याचे पत्र स्विकारत सर्वांचे आभार मानले. ( Maval Lok Sabha Pimpri-Chinchwad City Welfare Party of India announces support for Sanjog Waghere )
प्रसंगी वेल्फेअर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सालार शेख, पुणे जिल्हाध्यक्ष जावेद सौदागर, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अमिल सैफी, खाजाभाई नदाफ, इब्राहिम शेख, तौसिफ पठाण, सलीम नदाफ, चांदभाई शेख, उस्मानभाई शेख, तैय्यब चौधरी, अय्यूब शेख, फजल पटेल, ज्ञानेश्वर माशाळकर, हबीब शेख, समीर शेख, हुशेन शेख, येहसान भाई, मारुती काळे, फारुक गप बागवान, इरफान शेख, इमरान शेख यांच्यासह वेल्फेअर पार्टीतील युवा आघाडी व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट । Maval Lok Sabha
– मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News