मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. तसेच उरण येथे तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मैदानात जाहीर सभाही घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘आजपासून आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच चिन्ह असायला हवं, मशाल आणि ह्या मशालीनेच भाजपला तडीपार करायचं,’ असा निर्धार आदित्य ठाकरेंनी सर्वांसमोर बोलून दाखवला. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, रायगड संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शेकाप आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना माजी आमदार मनोहर भोईर, शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे इत्यादी उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Shivsena UBT candidate Sanjog Waghere Aditya Thackeray campaign Rally )
कर्जत येथेही जाहीर सभा –
उमेदवार संजोग वाघेरे ह्यांच्या प्रचारार्थ कर्जतमधील टिळक चौकात येथेही आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली. जाहीर सभेत आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. प्रत्येक राज्यात निर्माण झालेली अस्थिरता, राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावीच लागेल, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी नागरिकांना केलं.
सभेला शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बरगे, शिवसेनेचे रायगड संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, आपचे रियाज पठाण, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सदस्य) गोपाळ शेळके ह्यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha
– मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन
– ‘कामच करून टाकेन…’, मावळमध्ये विरोधी उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा सज्जड दम !