मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शनिवारी (दि. 20) चिंचवड परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. यावेळी ठिकठिकाणी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवकांनी, तसेच महिला भगिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजोग वाघेरे पाटील यांंनी नागरिकांशी संवाद साधत मशाल चिन्हाचे बटन दाबून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी चिंचवडगावातील दर्शन नगरी, चित्तराव, गणपती मंदिर, प्रभात कॉलनी, मोरया गोसावी, राज पार्क, गोयल गरिमा, सोनेगिरा टाऊनशिप, काकडे पार्क, विवेक वसाहत, साईबाबा मंदिर, निंबाळकर आळी, भोईर आळी, तालेरा हॉस्पिटल परिसर, शिवाजी उदय मंडळ, लोंढे नगर व भीम नगर परिसरातून कार्यकर्त्यांसह मोठ्या संखेने पदयात्रा काढून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. ( Maval Lok Sabha spontaneous response to Mahavikas Aghadi candidate Sanjog Waghere in Chinchwad )
माजी नगरसेवक अनंत को-हाळे, ज्योतीताई निंबाळकर, शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे, उपजिल्हा समितीच्या वैशालीताई मराठे, कविता कोंढे देशमुख, राहुल भोईर, सागर चिंचवडे, निखील भोईर, सागर वाघेरे, विशाल जाधव, कॉंग्रेसचे संदीप शिंदे, झेवियर अंथनी, शेखर लोणकर, सुधाकर कुंभार, समन्वयक उषा अल्हाट, श्रीमंत गिरी, देवराम गावडे, राजू बुचडे, विशाल काळे, सचिन चिंचवडे, रेखा मोरे, प्रवीण शिंदे, आम आदमी पक्षाचे संघटक सचिन पवार, भ्रमानंद जाधव, राहुल वाघमारे, मीनाताई जावळे, संग्रामिनी जावळे, प्रकाश हगवणे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– दुःखद ! वडगाव शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे निधन । Vadgaon Maval
– वडगावात मनसेकडून खळ्ळं खट्याक! ग्रामदैवताच्या मंदिराजवळील अवैध ताडी केंद्रावर चालवला बुलडोझर – पाहा व्हिडिओ
– पुणे जिल्हा : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाची कारवाई । Pune News