Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल शेळके हे आमदार आहेत. परंतू पारंपारिकदृष्ट्या मावळ मतदारसंघ हा भाजपाकडे राहिल्याचे दिसते. त्यामुळे सध्या विधानसभा निवडणूकीपूर्वी मावळात महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान युतीकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसताना, जागा वाटप जाहीर झालेले नसताना मावळ विधानसभेत भाजपाकडून होत असलेल्या हालचालींबद्दल आमदार सुनिल शेळके यांनी आपले मौन सोडले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. “लोकसभेच्या निवडणूकीला जे अजितदादांच्या कामाबद्दल बोलत होते, आमदाराच्या कामगाराबद्दल बोलत होते, तेच आता गावोगावी जाऊन सांगत आहेत की, अजित पवारांनी गोळीबाराचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही. अशा प्रकारचे आता बोलू लागल्यामुळे याला राजकीय वास येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना भडकवायचे आणि संभ्रमित करायचे काम सुरू आहे. आपण पक्षाचे निष्ठावंत असल्याचे सांगायचे, मात्र आतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायचे प्रयत्न सुरू आहेत,” असा गंभीर आरोप शेळके यांनी केला आहे.
- मावळ तालुक्यामधील भाजपाचे काही ठराविक कार्यकर्ते शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीदरम्यान केला. तुतारीच्या उमेदवाराला छुपा पाठींबा देऊन स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करू नये, असे शेळकेंनी बजावले आहे. तसेच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे. तो सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. असे म्हणत पिंपरी आणि मावळच्या भाजपा कार्यकर्त्यांचे आमदार सुनील शेळके यांनी कान टोचले आहेत.
भाजपातील काहीजण गावा-गावांमध्ये जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असे सांगत आहेत. मागच्या दीड वर्षात असं ते कधीही बोललेले नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म महत्त्वाचा आहे. तो पाळून आपण काम केले पाहिजे, असं म्हणणारी भाजपा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये महायुतीचा धर्म पाळून आपण काम केले पाहिजे, असे जे बोलत होते. तेच आता मावळमधील गावा-गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी गोळीबार केला. शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले. त्या पक्षाला मदत करू नका असा प्रचार करत आहेत., असे सुनील शेळके यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वांत अगोदर विरोध करणाऱ्या सुनिल शेळके यांना आगामी विधानसभा निवडणूक सोपी जाईल, असे दिसत नाहीत. महायुतीत जी धुसपूस सुरू झाली आहे. त्यातून शेळकेंना स्वपक्षीयांसोबतच महायुतीतील नेत्यांचे आव्हान पेलावे लागेल, असी परिस्थिती दिसत आहे. त्यात आमदार सुनिल शेळके यांनी भाजपावर गंभीर आरोप केल्यामुळे मावळ विधानसभेच्या जागेमुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा –
– ‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke