‘पुत्र व्हावा येसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!’ या उक्तीनुसार वडीलांनी मुलाबद्दल पाहिलेलं स्वप्न जेव्हा मुलगा सत्यात उतरवतो आणि ते सत्य डोळ्यांनी पाहायचे भाग्य जेव्हा पित्याला लाभते, तेव्हा त्या क्षणाचा आनंद शब्दात वर्णवता येत नाही.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अगदी त्याच प्रमाणे, आपला मुलगा आमदार व्हावा हे स्वप्न तळेगावमधील उद्योजक शंकरराव शेळके यांनी पाहिले, आणि अथक सायास करत सुनिल शेळके यांनी ते साकार केले. इतकेच नाही तर मावळचे दमदार आमदार म्हणून ते सध्या कार्य करत आहेत. मंगळवारी (21 मार्च) प्रथमच आमदार शेळके यांनी त्यांचे पिता शंकरराव शेळके यांना अधिवेशनादरम्यान विधानभवनात नेले. त्यानंतर या प्रसंगाबद्दल एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर केली. ( Maval MLA Sunil Shelke with his father Shankarao Shelke at Vidhan Bhavan in Mumbai )
‘मुलगा आमदार व्हावा हे स्वप्न ज्यांनी पाहिलं’ आणि त्यासाठी नेहमी खंबीरपणे पाठिशी उभे राहिले ते म्हणजे ‘माझे वडील (भाऊ).’ आज त्यांना पहिल्यांदाच अधिवेशनादरम्यान विधानभवनात घेऊन गेलो, याचे मनस्वी समाधान वाटले, असे आमदार शेळके म्हटले.
'मुलगा आमदार व्हावा हे स्वप्न ज्यांनी पाहिलं' आणि त्यासाठी खंबीरपणे पाठिशी नेहमी उभे राहिले ते म्हणजे 'माझे वडील (भाऊ).' आज त्यांना पहिल्यांदाच अधिवेशनादरम्यान विधानभवनात घेऊन गेलो,याचे मनस्वी समाधान वाटले.
यावेळी आमदार श्री.निलेशजी लंके, श्री.दौलतराव भेगडे, श्री.अशोकराव दाभाडे, pic.twitter.com/M2ecH3hx9h— Sunil Shelke (@shelkesunilanna) March 21, 2023
यावेळी आमदार निलेश लंके, आमदार शेखर निकम, दौलतराव भेगडे, अशोकराव दाभाडे, केशवराव दाभाडे, भिकनराव दाभाडे, गुलाबराव लोणाग्रे, बबनराव धामणकर, विनायकराव हांडे, निलेश वारिंगे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– नातवासाठी कायपण! मावळात चिमुकल्याच्या नामकरण सोहळ्याला भरवला कुस्त्यांचा आखाडा; इनामात दुभती म्हैस अन् चांदीची गदा
– वन्यजीवांसाठी स्वर्ग असलेला तालुका; मावळच्या पक्षी वैभवात आणखी एक मानाचा तुरा, नक्की वाचा