मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारिणी नियुक्तीपत्र वाटप आणि संवाद मेळावा वडगाव मावळ येथे गुरुवारी (दि. 7 मार्च) संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांसह, राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, सर्व विभाग अध्यक्षा, शहराध्यक्षा आणि पदाधिकारी महिला-भगिनी उपस्थित होत्या. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
“उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवली आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत पक्षाची कामे पोहोचवण्याचे कार्य पदाधिकाऱ्यांना करावयाचे आहे. ग्रामीण भागातील महिलांना देखील संघटनेत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. संधीचे सोनं करीत पक्ष वाढीसाठी सकारात्मकपणे काम करा. पक्षाला कामांमधून जनतेसोबत जोडण्याचं काम करा आणि पक्षासोबत परिवार म्हणून काम करा. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे व पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही महिला कार्यकारिणी सक्षम ठरेल, हा विश्वास मला आहे.” असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले. ( Maval NCP Mahila Congress Executive Appointment Letter Distribution And Dialogue Meeting at Vadgaon )
अधिक वाचा –
– ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क
– ‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke
– धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar