व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील महिलांना मोठे गिफ्ट! जागतिक महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

आज 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्री शक्तीचा गौरव आणि वंदन करण्याचा आजचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिला भगिनींना मोठे गिफ्ट दिले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 8, 2024
in देश-विदेश
PM-Narendra-Modi-LPG-GAS

Photo Courtesy : Team Dainik Maval


आज 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्री शक्तीचा गौरव आणि वंदन करण्याचा आजचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिला भगिनींना मोठे गिफ्ट दिले आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांसाठी हा एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया हॅन्डल वरून केली. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आज महिला दिन आहे. त्यामुळे आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार आहे.’ ( PM Narendra Modi Announces Rs 100 Cut In LPG Cylinder Prices )

महिला दिवस के अवसर पर आज हमने एलपीजी सिलेंडर की कीमतों में 100 रुपये की छूट का बड़ा फैसला किया है। इससे नारी शक्ति का जीवन आसान होने के साथ ही करोड़ों परिवारों का आर्थिक बोझ भी कम होगा। यह कदम पर्यावरण संरक्षण में भी मददगार बनेगा, जिससे पूरे परिवार का स्वास्थ्य भी बेहतर रहेगा।

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत (एक्स पोस्ट) म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला सलाम करतो. तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण्यासाठी कटिबद्ध आहोत.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत आणि कौतूक होत आहे.

Today, on Women’s Day, our Government has decided to reduce LPG cylinder prices by Rs. 100. This will significantly ease the financial burden on millions of households across the country, especially benefiting our Nari Shakti.

By making cooking gas more affordable, we also aim…

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– Breaking! पुणे ग्रामीण भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ठिकाणी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम तोडल्यास कारवाई होणार
– ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क
– ‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव येथे मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कार्यकारिणी नियुक्तीपत्रे वाटप आणि संवाद मेळावा संपन्न । Maval NCP

Next Post

मावळात विकास कामांचा धडाका सुरुच; खासदार श्रीरंग बारणेंच्या हस्ते पवनमावळात 13 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barne-maval-taluka

मावळात विकास कामांचा धडाका सुरुच; खासदार श्रीरंग बारणेंच्या हस्ते पवनमावळात 13 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.