व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात विकास कामांचा धडाका सुरुच; खासदार श्रीरंग बारणेंच्या हस्ते पवनमावळात 13 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

पवन मावळ विभागातील विविध गावांमध्ये 13 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन खासदार बारणे यांनी केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 8, 2024
in लोकल, ग्रामीण
shrirang-barne-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघातील मावळ तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरुच ठेवला आहे. पवन मावळ विभागातील विविध गावांमध्ये 13 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन खासदार बारणे यांनी केले. गावांमध्ये चांगले रस्ते झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत खासदार बारणे यांचे आभार मानले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, करंज बेडसे, कडधे, येळसे, पवनानगर – काले, मळवंडी प. मा, थुगांव आणि शिवणे येथील तब्बल 13 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. या भूमिपूजनाच्या निमित्ताने खासदार बारणे स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हूलावळे, उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजू खंडभोर, शिवसेना उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना देहूगावचे शहर प्रमुख सुनील हगवणे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, अकुंश देशमुख, मुन्नाभाऊ मोरे, सरपंच,उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ( Bhumi Pujan of varius development works in Pavan Maval Area by MP Shrirang Barane )

‘विकासाच्या दृष्टीकोणातून सर्वाधिक निधी मावळला दिला आहे. मावळात गावे विस्तारली आहेत. प्रत्येक गावात जाण्यासाठी तसेच अंतर्गत रस्ते करण्यावर भर दिला. माझे कर्तव्य मी पार पाडले आहे. राज्यात चांगल्या विचारांचे महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासत नाही. भरघोस निधी मिळत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या निधीतून मावळात मोठी विकास कामे केली. जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे केली. सामाजिक न्याय, नगरविकास, जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला. एमएमआरडी, पीएमआरडीएच्या माध्यामातूनही अनेक कामे मार्गी लावली आहेत.’ – खासदार श्रीरंग बारणे

तळेगाव-चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार –
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत तळेगाव-चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल. या सरकारच्या माध्यमातून त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. कार्ला एकविरा देवी विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. पर्यटनासाठी निधी जाहीर केला आहे. लोणावळा, खंडाळ्यातील पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. विकासासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री भरघोस निधी देत आहेत. केंद्रात, राज्यात एका विचाराचे सरकार असल्यामुळे त्याचा फायदा मावळ तालुक्याच्या विकासासाठी होत असल्याचेही खासदार बारणे म्हणाले.

अधिक वाचा –
– वडगाव येथे मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कार्यकारिणी नियुक्तीपत्रे वाटप आणि संवाद मेळावा संपन्न । Maval NCP
– महाशिवरात्रीच्या दिवशीच घरातील देव्हाऱ्याजवळ नागाचे दर्शन, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळला – पाहा व्हिडिओ
– पुणे ग्रामीण भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ठिकाणी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम तोडल्यास कारवाई होणार


Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील महिलांना मोठे गिफ्ट! जागतिक महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

Next Post

कामशेत आणि वडगाव येथील 2 ऑर्केस्ट्रा बारवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई! बार मालकांवर गुन्हे दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
IPS-Satya-Sai-Karthik

कामशेत आणि वडगाव येथील 2 ऑर्केस्ट्रा बारवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई! बार मालकांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.