Dainik Maval News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघातील लढती चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. यापैकीच एक आहे, मावळ विधानसभा मतदारसंघातील लढत. मावळ मध्ये महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनिल शेळके हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर बापू भेगडे उमेदवार आहे. बापू भेगडे यांना भाजपाच्या बहुतांश प्रमुख नेत्यांनी साथ दिली असून सर्वपक्षीय उमेदवार असा नवा मावळ पॅटर्न अस्तित्वात आला आहे.
मावळ विधानसभेतील या ‘मावळ पॅटर्न’ची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. पण या पॅटर्नमुळे अडचणीत येत असलेल्या सुनिल शेळके या आपल्या लाडक्या आमदारासाठी अजित पवार स्वतः मैदानात उतरले असल्याचे दिसत आहेत.
चिंचवडमध्ये महायुतीकडून शंकर जगताप तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे अशी लढत होईल, असे वाटले होते. परंतु राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी येथे बंडखोर करुन आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यातून थेट शंकर जगताप यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नाना काटे यांची भेट घेतली. पण या भेटीनंतरही नाना काटे माघार घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
नाना काटे यांच्या या बंडखोरी आणि माघारीच्या गणितामागे अजित पवार यांची राजकीय खेळी असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे. चिंचवड च्या शेजारील अर्थात मावळ विधानसभेत ‘मावळ’मुळे अडचणीत येत असलेल्या सुनिल शेळके यांच्यासाठी नवा चिंचवड पॅटर्न उभा केला जात असल्याचे बोलले जात आहे. मावळचे सध्याचे विरोधी राजकारण मोडून काढण्यासाठी चिंचवडमधून राजकारण केले जात असल्याचे चर्चिले जात आहे.
मावळ मतदारसंघात अजित पवार यांचे निष्ठावंत आमदार सुनिल शेळके यांना महायुतीकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून बापूसाहेब भेगडे यांनी अर्ज दाखल केला आहे. परंतु महत्वाचं म्हणचे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील अनेक पक्षातील नेत्यांनी बापू भेगडे यांना पाठींबा दिला आहे. यातही महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपा नेत्यांनी त्यातही माजी मंत्री बाळा भेगडे, रवींद्र मेगडे, गणेश भेगडे यांनी बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठींबा दिलाय.
त्यामुळे काही प्रमाणात सुनिल शेळके हे अडचणीत आले आहे. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी मावळ पॅटर्नच्या धर्तीवर नवा चिंचवड पॅटर्न तयार होत असल्याचे बोलले जात आहे. मावळच्या राजकारणाला, मावळ पॅटर्नला उत्तर म्हणून नवा चिंचवड पॅटर्न निर्माण होतोना दिसत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजपाचे कार्यकर्ते काम करतील ; सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– बापूसाहेब भेगडे हे मावळातील जनतेचे उमेदवार, त्यामुळे परिवर्तन अटळ – रामदास काकडे