तालुक्याचा ( Maval Taluka ) सुपूत्र सार्थक घोजगे ( Sarthak Ghojge ) याने राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी त्याची पाठ थोपटली आहे. सार्थक घोजगे याने बालेवाडी येथे झालेल्या स्पर्धेत थाळीफेक मध्ये रौप्य पदाकाची कामगिरी करुन तालुक्याची मान उंचावली आहे. ( Maval Sarthak Ghojge Won Silver Medal in Discus Throw Competition )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुण्याजवळील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलात राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. यात चौदा वर्षाखालील गटात थाळी फेक स्पर्धेत मावळ तालुक्यातील कु. सार्थक (शौर्य) संदीप घोजगे याने रौप्य पदक ( सिलव्हर मेडल ) मिळवले. तसेच त्याचे CISCE च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतूक करत आमदार शेळके यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– महाविद्यालयीन तरुणाची टोळक्याकडून हत्या, तळेगाव दाभाडेतील खळबळजनक घटना
– भयंकर! रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृत्यू, रेल्वे अंगावरुन गेल्याने शरीराच्या अक्षरशः ठिकऱ्या