मावळ तालुक्यातील शिवणे-सडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सडवली येथील रेखा रामदास थोरवत यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच संगीता गायकवाड यांनी त्यांच्या पदाचा निश्चित केलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. ( Maval Shivne Sadavli Gram Panchayat Election Rekha Thorvat Elected as Deputy Sarpanch )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे उपसरपंचपदासाठी सरपंच अजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी रेखा थोरवत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका विद्या लोखंडे यांनी काम पाहिले.
सरपंच अजित चौधरी, माजी उपसरपंच संगीता गायकवाड, नवनाथ साळुंके, महेंद्र वाळुंज, कविता शेठे, मिनाक्षी शिवणेकर आदी ग्रामपंचायत सदस्यांसह माजी जिल्हा परिषद भरत शिंदे, मावळ केसरी पै खंडू वाळुंज, दत्ता ओझरकर, संजय भवार, शिवणे सोसायटीचे संचालक तुकाराम लोहकरे, भागुजी केंडे, चंद्रकांत गराडे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोरवत यांच्या निवडीनंतर त्यांचा खास सन्मान करण्यात आला.
अधिक वाचा –
– सह्याद्री प्रतिष्ठान आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून 45 विद्यार्थ्यांना किल्ले लोहगड दुर्गदर्शन
– मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध, बहुतांश विद्यमान संचालकांचीच संघावर पुन्हा वर्णी