पवनमावळ मधील ठाकुरसाई – गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतच्या ( Thakursai Gevande Khadak Gram Panchayat ) उपसरपंचपदी अरविंद रोकडे ( Arvind Rokade ) यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या मावळत्या उपसरपंच मंगल कारके यांनी पदाचा निश्चित केलेला कार्यकाल पूर्ण केल्याने पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच नारायण बोडके यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विहित वेळेत अरविंद रोकडे यांचा आणि धर्मेंद्र ठाकर यांचा असे दोन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी निवडणूकीत अरविंद रोकडे यांना 5 तर धर्मेंद्र ठाकर यांना 3 मते प्राप्त झाली. त्यामुळे बहुमताने अरविंद रोकडे हे उपसरपंच पदी निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक नंदा बाबर यांनी रोकडे यांची निवड जाहीर केली.
सरपंच नारायण बोडके, ग्रामपंचायत सदस्य कमल मानकर, निर्मला भोसले, रेखा ठाकर, धर्मेंद्र ठाकर, मंगल कारके, रामदास खैरे आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पुर्ण होताच अरविंद रोकडे समर्थक आणि पाठिंबा दिलेल्या सदस्यांनी एकच जल्लोष केला. तसेच, निवडीनंतर रोकडे यांचा खास सन्मान करण्यात आला. ( Thakursai Gevande Khadak Gram Panchayat Deputy Sarpanch Election )
अधिक वाचा –
– मावळचं राजकारण I मामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, भाच्याने ठणकावून सांगितले
– डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल; वडगाव भाजपाचे निवेदन