वडगाव मावळ ( Vadgaon Maval City ) शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण ( Dengue Fever ) आढळून आले. तसेच, त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरभर या आजाराने थैमान घातलेले असताना, नगरपंचायतीकडून काही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर वडगाव शहर भारतीय जनता पार्टीकडून नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ( BJP Latter To Administration Over Dengue Fever Outbreak In Vadgaon Maval City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘सुस्तावलेले प्रशासन आणि सत्ताधारी यांनी लवकरात लवकर डेंग्यूच्या डासांचे, साथीच्या रोगांसाठीचे ठोस उपाय योजावेत. शहरात औषध फवारणी करून जनतेला दिलासा द्यावा’, अशी मागणी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे यांनी निवेदनात केली आहे. वडगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले.
हेही वाचा – वडगावमध्ये भक्तीमय वातावरणात सुरु आहे काकडा आरती सोहळा
डेंग्यूला आळा घालण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा विनंतीवजा इशारा यावेळी देण्यात आला. सदर निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, भा.ज.यु.मो. अध्यक्ष विनायक भेगडे, भा.ज.यु.मो. सरचिटणीस अतुल म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, प्रसिद्धी प्रमुख अमोल ठोंबरे तसेच सरचिटणीस कल्पेश भोंडवे, मकरंद बवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळचं राजकारण I मामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, भाच्याने ठणकावून सांगितले
– कामशेतमध्ये नागरिकांनी सामुहिकरित्या ऐकली पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’