पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ शहरात जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा ( Weightlifting Competition ) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव सुधीर म्हाळसकर यांनी दिली. वडगाव ( Vadgaon ) येथे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज ( Shri Potoba Maharaj ) मंदिराच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. ( Pune District Level Weightlifting Competition At Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
युथ (17 वर्षाखालील मुले आणि मुली), ज्युनिअर (20 वर्षाखालील मुले आणि मुली) आणि सीनियर (मुले आणि मुली) अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल. या स्पर्धेमधून रावेर (जळगाव) येथे 24 ते 27 नोहेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेची प्रवेशिका भरण्यासाठी ऑनलाइन लिंक शनिवारी (दिनांक 29 ऑक्टोबर) रोजी खुली होऊन 31 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता बंद होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी संघटनेच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– सोशल मीडियावर पिस्तूलाची जाहिरात करणे पडले महागात, पवनानगरमधील सराईत गुन्हेगाराला अटक
– ‘हा मंत्री नितीन गडकरी खड्डा… हा खासदार श्रीरंग बारणे खड्डा !’ मावळ तालुक्यातील अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा