व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 3, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नसरापूर ( ता. भोर ) येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी ( दि. २ मे ) पुणे येथील धायरी येथे जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली.

Novel NIBR Ads

यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्याशी संवाद साधला. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास त्यांना दिला. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली.

या प्रकरणात खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्युदंडापर्यंतची शिक्षा होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे सांगितले.

दरम्यान, हे अमानुष कृत्य करणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधात सबळ पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असून यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार आहे. तसेच पॉक्सो कायद्यानुसार आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

Novel NIBR Ads

अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून, दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा ठाम इशाराही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला.

नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल
नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुदैवी आणि संतापजनक आहे.या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे.

या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे. बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

Next Post

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.