व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

भोर तालुक्यातील नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना आता चाकणच्या औद्योगिक परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 3, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : भोर तालुक्यातील नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना आता चाकणच्या औद्योगिक परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे तीन वर्षाच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आता संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

Novel NIBR Ads

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खालुंब्रे गावच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहत होता. शेजारी घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला त्याने आपल्या खोलीत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याचा गळा कापत खून केला. एवढ्यावरच न थांबता, पुरावे लपवण्यासाठी त्याने मृतदेह बॅगेत भरून ठेवला आणि घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शोध सुरू केला. पोलिसांनाही तातडीने माहिती देण्यात आली. महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपीचा माग काढण्यात आला. अखेर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी आपल्या मूळ गावी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होता. अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

पीडित चिमुकला हा मध्यप्रदेशातून कामानिमित्त येथे आलेल्या दाम्पत्याचा मुलगा होता. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार, तसेच ‘पोस्को’ आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

Next Post

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.