व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत नेतृत्व बदलाचे वारे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 5, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संभाजी आनंदराव शिंदे यांनी आज रोजी (दि. ५ मार्च) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण यांच्याकडे शिंदे यांनी पदाचा राजीनामा सादर केला आहे. आपण स्वखुशीने राजीनामा देत असून तो मंजूर करावा, असे संभाजी शिंदे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान, उपसभापती नामदेव शेलार यांच्या राजीनाम्यानंतर आता सभापती संभाजी शिंदे यांनीही राजीनामा दिल्यामुळे मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

मे २०२३ मध्ये तब्बल बारा वर्षांनी मावळ बाजार समितीची निवडणूक झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या पॅनलचे १७ तर, भाजपाचा समावेश असलेल्या पॅनलचे १ असे एकूण १८ संचालक निवडून आले होते. या संचालकांमधून २४ मे २०२३ रोजी सभापतीपदी संभाजी शिंदे आणि उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची निवड झाली होती. सर्व संचालकांची भावना लक्षात घेत सर्वांना संधी मिळावी याकरीता सभापती-उपसभापती पदाकरिता काही कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु तदनंतर राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचा परिणाम मावळच्या राजकारणावरही झाला आणि दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे लांबले. परंतु आज अखेर सभापती – उपसभापती पदाचे राजीनामे झाल्यामुळे लवकरच बाजार समितीवर नवीन कारभारी निवडले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सभापती म्हणून संभाजी शिंदे यांचे भरीव योगदान
संभाजी शिंदे हे जेव्हा मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले, तेव्हा त्या पदाला ‘ओसाड गावची पाटीलकी’ असे उपहासाने बोलले जात होते. कारण 1957 मध्ये स्थापना झालेल्या बाजार समितीचा कारभार कालांतराने डळमळीत होत गेला. चांगले कार्यालय नाही, प्रॉपर्टी आहे पण उलाढाल नाही, अशी बाजार समितीची अवस्था होती. परंतु संभाजी शिंदे यांनी सभापती पदाच्या कार्यकाळात या ओसाड गावचे रूप बदलून बाजार समितीला नवी ओळख दिली.

बाजार समितीचे सुसज्ज कार्यालय उभारले. ६ एकर क्षेत्रात वॉल कंपाऊंड व सुशोभिकरणाची कामे केली. बाजार समितीचा २२ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला असुन लवकरच सर्व कामे सुरू होतील. यासह शिवणे, वडेश्वर येथे उपबाजार स्थापन केले. तसेच इंदुरी उप बाजाराचे उद्घाटनही लवकरच होईल. स्व. अजित पवार आणि सहकारमहर्षी माऊली दाभाडे, आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन सभापती शिंदे यांनी बाजार समितीचे रूप पालटविले. त्यामुळेच आजवर झालेल्या सभापतींपैकी संभाजी शिंदे यांचे योगदान नक्कीच भरीव आणि संस्मरणीय असे राहिले आहे.

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ
संभाजी शिंदे (मा. सभापती), नामदेव शेलार (मा. उपसभापती), सुभाष जाधव, मारुती वाळुंज, दिलिप ढोरे, विलास मालपोटे, बंडू घोजगे, साईनाथ मांडेकर, सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभुळकर, शिवाजी असवले, नथुराम वाघमारे, विक्रम कलवडे, विलास मानकर, अमोल मोकाशी, ॲड भरत टकले, नामदेव कोंडे, शंकर उर्फ बाळासाहेब वाजे

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


Previous Post

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

Next Post

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.