महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (9 मार्च) एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याला नेमके काय मिळाले आणि काय मिळायचे राहिले, या सर्व प्रश्नांची उत्तरे संपूर्ण तालुकावासियांना लवकरच मिळणार आहे. याचे कारण राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता मावळचे आजी आणि माजी आमदार पत्रकार परिषद घेऊन यातील बाजू मांडणार आहेत. ( Maval Taluka Current MLA Sunil Shelke And Former MLA Bala Bhegde Press Conference At Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल शेळके हे याच विषयावर रविवारी (दिनांक 12 मार्च) रोजी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह वडगाव येथे होणार आहे. तर मावळचे माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते बाळा भेगडे हे शनिवारी (दिनांक 11 मार्च) रोजी वडगाव येथील भाजप कार्यालयात सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी खास तरतूद, ‘या’ कार्यासाठी तब्बल 25 कोटी जाहीर
एकंदरीत या दोन्ही पत्रकार परिषदांतून मावळ तालुक्याच्या वाट्याला नेमके शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पातून काय मिळाले आणि काय मिळायचे बाकी राहिले हे सर्वसामान्य जनतेला समजेल, हे मात्र नक्की.
अधिक वाचा –
– जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन
– वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार – व्हिडिओ