महाराष्ट्र नाभिक महामडंळ पुणे जिल्हा आयोजित महाराष्ट्र नाभिक महामडंळ मावळ तालुका कार्यकारणीची बैठक श्री पोटोबा महाराज मंदिर वडगाव मावळ इथे सोमवार, दिनांक 29 मे रोजी संपन्न झाली. महाराष्ट्र नाभिक महामडंळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरुदास आंबेगावचे माजी सरपंच हभप रविकांत रसाळ होते. महाराष्ट्र नाभिक महामडंळाचे अध्यक्ष अशोक नारायण मगर यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली. राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील ओबीसींचे आरक्षण टीकवण्यासाठी बारा बलुतेदार संघटनांनी संघटनात्मक बांधनी करुन संघटनेत युवकांना संधी द्यावी, असे यावेळी ठरवण्यात आले.
महाराष्ट्र नाभिक महामडंळ पुणे जिल्हा माजी अध्यक्ष रमेश राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर रोहिणी आयोग लागू करुन ओ.बी.सी. घटकांवर अन्याय होणार नाही याची दखल घेतली पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले. या बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर कऱण्यात आली. ज्यात मावळ तालुका अध्यक्ष पदी संतोष तुकाराम रसाळ यांची निवड करण्यात आली. ( maval taluka executive committee of maharashtra nabhik mahamandal announced )
महाराष्ट्र नाभिक महामडंळ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष – संतोष तुकाराम रसाळ
उपाध्यक्ष – योगेश बाळासाहेब ढमाले
कार्याध्यक्ष – रामदास बंडू कदम
सचिव – सागर खडके
सहसचिव – संदिप किसनराव बिडकर (पाटील)
युवकअध्यक्ष – राजेंद्र अरुण मोरे
युवक सचिव – रोहिदास नामदेव आंबेकर
तालुका संघटक – हिरामण आढाव
पुणे जिल्हा संघटक – विनायक ज्ञानोबा क्षिरसागर
पुणे जिल्हा उपसंघटक – बाळासाहेब दत्तात्रय लोखंडी
तालुका सल्लागार – रवींद्र राऊत (इंदुरी)
तालुका सल्लागार – चंद्रशेखर शिंदे
कार्यकारिणीत निवड झालेल्या कार्यकर्त्यांचे यावेळी सर्वांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा सचिव नितीन कुटे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सुनील दिगंबर वाळुंज यांनी केले. आभार ह.भ.प. विठ्ठल महाराज पांडे यांनी मानले.
या प्रसंगी बाळासाहेब खंडागळे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ), राज्य कार्यकारणी सदस्य शंकरराव रायकर, नवलाख उंब्रे गावचे माजी सरपंच नागेश शिर्के, आढले गावचे माजी सरपंच दिनेश कदम, समाज भूषण नाथा महाराज मोरे, वेहेरगावचे माजी सरपंच संतोष रसाळ, सागर कदम, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– निगडे येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; निगडे, कल्हाटसह पाच गावातील नागरिकांना दिलासा
– भोयरे गावातील अंतर्गत रस्ते विकास कामाला सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध