व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा केला

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 31, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Taluka Kharedi Vikri Sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा केला असून बारामती संघाच्या प्रमाणे मावळ तालुक्यातील संघाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारे प्रकल्प सुरू करण्याचा निश्चय केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले, उपसभापती अमोल भोईरकर, संचालक बाजीराव वाजे, रुपेश घोजगे, माणिक गाडे, गणेश विनोदे, शहाजी कडू, एकनाथ येवले, विष्णू घरदाळे, प्रमोद दळवी, शरद नखाते, सचिव किरण लोहर यांनी बारामती येथील खरेदी विक्री संघाच्या विविध प्रकल्पांची पाहणी करत संघाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. ( Maval Taluka Kharedi Vikri Sangh Members Study Tour to Baramati )

  • दोन महिन्यांपूर्वी संघाची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्याच मासिक सभेत नूतन संचालक मंडळाने बारामती संघाला भेट देऊन तेथील प्रकल्प व कामकाज याची माहिती घेण्याचा निर्णय केला होता, त्यानुसार या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामती संघाचे चेअरमन विक्रम भोसले, संचालक शिवाजीराव टेंगळे, रवींद्र माने, उदयसिंग धुमाळ, मॅनेजर लोणकर यांनी सर्व प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.

यामध्ये प्रामुख्याने बारामती संघाच्या वतीने चालविण्यात येणारे पेट्रोलपंप, सी एन जी पंप, मेडिकल व्यवसाय, खते, औषधे, बी – बियाणे, धान्य आदींची विक्री व गोदाम, व्यापारी संकुल, प्रस्तावित मंगल कार्यालय व वेअर हाऊस आदी प्रकल्पांना मावळच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्प उभारणीपासून सद्यस्थितीत सुरू असलेल्या कारभारापर्यंत माहिती जाणून घेतली.

मावळ तालुक्यात बारामती प्रमाणे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून आगामी काळात महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय मावळच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून लवकरच याबाबत विशेष सभा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे चेअरमन असवले यांनी सांगितले.

“मावळ तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेऊन आम्हाला खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्याच्या दृष्टीने अभ्यास दौऱ्यापासून आम्ही सुरुवात केली असून आगामी काळात संघाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवनवीन प्रकल्प राबविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.” – शिवाजी असवले (सभापती, खरेदी विक्री संघ मावळ)

“मावळ तालुका खरेदी विक्री संघाला सद्यस्थितीत उत्पन्न सुरू आहे, परंतु ते अत्यंत तुटपुंजे आहे. संघाकडे कामशेत सारख्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी जागा आहे, याचा उपयोग करून बारामती प्रमाणे उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तयार करण्याचा आमचा मानस आहे.” – अमोल भोईरकर (उपसभापती, खरेदी विक्री संघ मावळ)

अधिक वाचा –
– प्रतिक्षा संपली… पुणे रिंगरोड बाबत अत्यंत महत्वाची अपडेट, लगेच वाचा । Pune Ring Road Update
– रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खालापूरमध्ये मॉकड्रिल संपन्न । Raigad News
– मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ‘प्रवीण ढमाले’ यांची नियुक्ती । Maval Lok Sabha


Previous Post

तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation

Next Post

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Scholarship

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.