व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपली असल्याने यापुढे विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नये, असेही समाज कल्याण विभागाकडून कळवण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 31, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Scholarship

File Image


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ( Swadhar Yojana ) ऑनलाईन अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत (हार्डकॉपी) ते शिकत असलेल्या महाविद्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत इयत्ता १० वी नंतरच्या इयत्ता ११ वी व १२ वी आदी अभ्यासक्रमांना तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २०१६-१७ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

२०२३-२४ या वर्षात नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत याकरीता लिंक व विहीत मुदत देण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण व नर्सिंग विद्यार्थ्यांचे निकाल इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत उशीरा लागल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत २० मे पर्यंत देण्यात आली होती. २० मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेल्या वैद्यकीय शिक्षण व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अर्जाची हार्डकॉपी ते शिकत असलेल्या महाविद्यालयातील समान संधी केंद्रात लवकरात लवकर जमा करावी.

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपली असल्याने यापुढे विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नये, असेही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मल्लीनाथ हरसुरे यांनी कळविले आहे. ( Important update for students Appeal to submit copy of Swadhar Yojana application in college )

अधिक वाचा –
– पाण्याशी मस्ती अंगाशी आली… कासारसाई धरणात बुडून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू !
– प्रतिक्षा संपली… पुणे रिंगरोड बाबत अत्यंत महत्वाची अपडेट, लगेच वाचा । Pune Ring Road Update
– रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खालापूरमध्ये मॉकड्रिल संपन्न । Raigad News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट

Next Post

सर्वांची लाडकी ‘लालपरी’ (एसटी बस) आज 76 वर्षांची झाली…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ST Bus

सर्वांची लाडकी 'लालपरी' (एसटी बस) आज 76 वर्षांची झाली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.