व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सर्वांची लाडकी ‘लालपरी’ (एसटी बस) आज 76 वर्षांची झाली…

दिनांक 1 जून, 1948 साली पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 1, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
ST Bus

Photo Courtesy : X


दिनांक 1 जून, 1948 साली पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी 1 जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. आज (दिनांक 1 जून) रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला पानाचे तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गेली 76 वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आता देखील ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडी-अडचणी, अडथळे, ‍आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाडया वस्त्यांपासून आदिवासी पाडया पर्यत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. त्यासाठी 87 हजार कर्मचारी व अधिकारी वृंद रात्रंदिवस राबत आहेत. केवळ 36 बेडफोर्ड बसेवर सुरू झालेला हा प्रवास 76 वर्षात 15 हजार बसेस पर्यंत पोहोचला आहे. या बसेसच्या माध्यमातून 560 पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. ( Maharashtra State Road Transport Corporation ST Bus Anniversary 1st June )

75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनी, पत्रकार अशा 30 पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवाशी सेवेमध्ये 33 टक्क्यावरून 100 टक्कयांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते. याबरोबरच गणेश उत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिर्की यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष् फेऱ्या सोडून एसटी सर्व सामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठी देखील एसटी आपली सेवा पुरवीत आहे.

एसटीची विविध रुपे…. pic.twitter.com/VlOzL1t2P8

— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) May 31, 2024

“गेली 76 वर्ष प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी “महाराष्ट्राची लोकवाहिनी” बनली आहे. भविष्यात देखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी कटिबध्द राहील!” अशी ग्वाही देत, लाखो प्रवाशांना एसटीच्या वतीने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा –
– प्रतिक्षा संपली… पुणे रिंगरोड बाबत अत्यंत महत्वाची अपडेट, लगेच वाचा । Pune Ring Road Update
– तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation


dainik maval jahirat

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana

Next Post

मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात, पेरणीची कामे अंतिम टप्प्यात !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pre-monsoon cultivation work in Maval taluka farm farmer rice

मान्सून तोंडावर... मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात, पेरणीची कामे अंतिम टप्प्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.