Dainik Maval News : वडगाव मावळ येथे सोमवारी (दि. 22 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचा मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. तसेच आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच काही निवडीही जाहीर करण्यात आल्या.
नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व संघटनात्मक विस्तार –
वडगाव मावळ येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खालील पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली ;
1. सुवर्णा राऊत – महिला अध्यक्ष, मावळ तालुका
2. वर्षा नवघणे – ग्रामीण महिला अध्यक्ष
3. सुरेश धोत्रे – तळेगाव शहर अध्यक्ष
4. सुशांत बालगुडे – विद्यार्थी आघाडी अध्यक्ष
5. रवी पवार – सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष
6. कुणाल आगळे – सामाजिक न्याय विभाग, तळेगाव शहर
7. निलेश टाक – सामाजिक न्याय विभाग, देहूरोड शहर
8. हरिश्चंद्र बगाड – आदिवासी सेल अध्यक्ष, मावळ तालुका
मेळाव्यास आमदार सुनील शेळके यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश आप्पा ढोरे, सुरेश चौधरी, विठ्ठल आण्णा शेळके, महादू कालेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, कृष्णा कारके, नारायण पाळेकर, तुकाराम आसवले, भरत येवले, सुहास गरुड, लक्ष्मण बालगुडे, नामदेव ठुले, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, सुरेश धोत्रे, अशोक भेगडे, दर्शन खांडगे, साहेबराव कारके, संदीप आंद्रे, भरत भोते, जीवन गायकवाड, किशोर सातकर, रुपेश घोजगे, मारुती देशमुख, पंढरीनाथ ढोरे, बाबूलाल नालबंद, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, भरत लिम्हण, सुवर्णताई राऊत शोभाताई कदम, पूजाताई दिवटे, कल्याणीताई काजळे,शबनम खान, तेजस्विनी गरुड, सुनीता कुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime

