Dainik Maval News : नाशिक येथे दिनांक २५ ते ३० एप्रिल दरम्यान पार पडलेल्या इंडिया तायक्वांदो फेडरेशन कप २०२५ या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत लोणावळ्यातील मावळ तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करताना २ सुवर्ण, २ रौप्य अशा एकूण ४ पदकांची कमाई केली.
स्पर्धेतील खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक विक्रम बोभाटे, यश बोभाटे आणि संस्कृती लेंडघर यांचे मार्गदर्शन लाभले. मावळ तालुका तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष गणेशभ गवळी, सचिव हर्षल होगले, खजिनदार रमेश विश्वकर्मा, अमोल गायकवाड, रविंद्र भोईने यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
पदक विजेते खेळाडू :
कु. अराध्या गायकवाड ( 23 किलो गट) – सुवर्ण पदक
कु. मल्हार लेंडघर (29 किलो गट) – सुवर्ण पदक
कु. अन्वय नायगावकर (23 किलो गट) – रौप्य पदक
कु. गायत्री चाकणे (42 किलो गट) – रौप्य पदक
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News