Dainik Maval News : शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक कुक्कुटपालन हा व्यवसाय किफायतशीर असून शेतकऱ्यांनी हा व्यवसाय चिकाटीने आणि मेहनतीने करावा, असे प्रतिपादन मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे यांनी केले. मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष सभा वडगाव मावळ येथे रविवारी (दि. ११ मे) संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते.
सभेचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष एकनाथ गाडे हे होते. या सभेस कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रवीण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बधाले, संचालक संभाजी केदारी, बाबाजी पठारे, विलास काटकर आधी पदाधिकारी उपस्थित होते. सभेत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भारत सरकारने लागू केलेली गाइडलाइन स्वीकारावी, ग्रामपंचायतींनी घरपट्टी माफ करावी, वीज बोर्डाकडून शेतकऱ्यांना ज्या दराने वीज पुरवली जाते त्याच दराने पोल्ट्री व्यवसायालाही वीज पुरवठा करावा, अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या. सभेस अध्यक्ष गाडे यांनी मार्गदर्शन केले. सुभाष केदारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro