व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार मावळ तालुक्याच्या राजधानीची शोभा !

आजतागायत म्हणजे तब्बल १३५ वर्षे हीच इमारत संपूर्ण मावळ तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय सेवा देत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 30, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Taluka Tehsil Office New Administrative Building Vadgaon Maval MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ब्रिटिश कालीन काळापासूनच मावळ तालुक्याची राजधानी ठरलेल्या वडगाव मावळ येथे सन १८९० मध्येच तालुक्याचा कारभार पाहणारी मामलेदार कचेरी सुरू झाली. सन १८८९ मध्ये कचेरी ची इमारत बांधण्यात आल्याची नोंद आजही दिसते. तेव्हापासून आजतागायत म्हणजे तब्बल १३५ वर्षे हीच इमारत संपूर्ण मावळ तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय सेवा देत आहे.

गेल्या २० वर्षात झपाट्याने नागरिकीकरण वाढत असताना त्या दृष्टीने अद्ययावत इमारत ही गरज वाटू लागली. परंतु, याबाबत आजतागायत ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. नेमकी ही गरज आमदार सुनील शेळके यांनी हेरली आणि पाच वर्षांपूर्वी निवडणूक लढतानाच प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस व्यक्त केला आणि निवडणुकीत विजयी होताच प्रशासकीय इमारत उभारून सर्व खात्यांचा कारभार एकाच छताखाली आणायचा अशी खूणगाठ बांधून पाठपुरावा सुरू केला.

आमदार सुनील शेळके यांनी अवघ्या दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून नवीन प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. आज या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित कार्यालयाच्या कामासाठी त्या त्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे वेळही वाया जात होता तसेच अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. परंतु या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर मात्र सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने नागरिकांच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

आमदार सुनील शेळके यांची दूरदृष्टी, चिकाटी आणि दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचाच हे ध्येय याच जोरावर दोन वर्षे कोरोना संकट, एक वर्ष विरोधी पक्षात असताना अण्णांनी तालुक्यासाठी सुमारे ४ हजार कोटींचा निधी आणला असून यामध्ये तालुक्याचे मुख्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीसाठी प्राधान्याने लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवीन प्रशासकीय इमारत पूर्ण झाल्यानंतर आवारातील शासकीय कार्यालयांच्या जुन्या इमारती पाडण्यात येतील तसेच इमारतीपुढे छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ही उभारण्यात येणार आहे. याशिवाय इमारतीच्या दोन्ही बाजूने मुंबई पुणे महामार्गाला जोडणारे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे मावळ तालुक्याचे मुख्यालय राजधानी असलेल्या वडगाव शहरालाही शोभा येणार असून येथील वाहतूक पार्किंगची समस्या ही मार्गी लागणार आहे.

तालुकास्तरीय शासकीय कार्यालय येणार एका छताखाली
मावळ तालुक्याच्या प्रशासकीय कामासंदर्भात ही प्रशासकीय इमारत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता एकाच शताखाली सर्व तालुकास्तरीय शासकीय कार्यालय येणार आहे त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी वेळ खर्च करावा लागणार नाही. यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग सहाय्यक निबंधक कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय अशी सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालयांचा समावेश असून प्रांताधिकारी कार्यालय सुद्धा याच इमारतीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई – बाबा मतदान करा… मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन
– देवेंद्र फडणवीसांचा आदेश डावलला, बाळा भेगडे यांचा बापू भेगडेंना पाठींबा कायम, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही !
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha


Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवारांकडून अर्ज दाखल ; शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी भरला अर्ज

Next Post

चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.