मावळ तालुका ( Maval Taluka ) विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. बहुतांशी विद्यमान संचालकांचीच ग्रामोद्योग संघावर पुन्हा वर्णी लागल्याचे दिसत आहे. तसेच एकूण अकरा जागांपैकी भटक्या जाती प्रवर्गाची एक जागा रिक्त आहे. ( Maval Taluka Various Executive Co-operative Village Industries Association Election )
मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाची ( Maval Taluka Gramodyog Sangh ) पंचवार्षिक निवडणूक 11 नोव्हेंबर रोजी होणार होती. तसेच, निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार सोमवारी (दिनांक 31 ऑक्टोबर) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विविध प्रवर्गाच्या एकूण 10 जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज बाकी राहिल्याने सर्व जागा बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी व्ही. पी. कोतकर यांनी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघावर निवडून आलेले उमेदवार आणि त्यांचा मतदारसंघ
1. उमाजी रमाजी भांडे (खनिज आधारित उद्योग)
2. चंद्रकांत चिंधू दहिभाते (वनावर आधारित उद्योग)
3. सुरज मदन बुटाला (कृषी आधारित व खाद्य उद्योग)
4. अंकुश रामचंद्र आंबेकर (पॉलिमर व रसायन आधारित उद्योग)
5. सुदेश एकनाथ गिरमे (अभियांत्रिकी व अपारंपरिक ऊर्जा उद्योग)
6. गणेश बाजीराव भांगरे (वस्त्रोद्योग व सेवा उद्योग)
7. कांचन लक्ष्मण भालेराव (महिला प्रतिनिधी)
8. कल्पना सुनिल कांबळे (महिला प्रतिनिधी)
9. अमित पांडुरंग ओव्हाळ (अनुसूचित जाती /जमाती वर्ग)
10. सोपान धोंडिबा कदम (इतर मागास प्रवर्ग)
11. भटक्या जाती-विमुक्त जमातीची जागा रिक्त
अधिक वाचा –
– भयंकर..! दारूड्या पोराचा बापाने केला खून, कुऱ्हाडीने घाव घालत केला भांडणाचा शेवट
– पवनानगर चौकाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपघाताला आयतं निमंत्रण