योग ही भारताची प्राचीन अशी परंपरा आणि ओळख आहे. तसेच क्रीडाप्रकार म्हणूनही आता योगासनांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून जून महिन्याच्या 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. तसेच योगासन चे अनेक क्रीडा स्पर्धाही भरवल्या जातायेत. भारत सरकारच्या पुढाकाराने योग हा एक उत्तम क्रीडा प्रकार म्हणून पुढे येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अशात मावळ तालुक्यातील दोन युवा खेळाडू योग क्रीडा प्रकारात स्वतःचं आणि तालुक्याचं नाव गाजवत आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यात आणि राज्याबाहेर सध्या मावळपुत्र आर्यन अरगडे आणि मावळकन्या वेदांगी अरगडे या दोन युवा खेळाडूंची नावांची चर्चा होताना दिसत आहे. ( maval taluka yoga masters aryan argade and vedangi argade news )
मावळ तालुक्यातील सोमाटणे गावातील हे दोन युवा खेळाडू. अल्पावधीत त्यांनी योगा क्षेत्रात मोठे कौशल्य आणि नाव प्राप्त केले आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हे दोघेही त्यांचे शरीर अगदी रबराप्रमाणे वळवू शकतात, इतकी लवचिकता प्राप्त केली आहे. सोशल मीडियावर देखील दोघेही योगा मास्टर्स नावाने ओळखले जात आहेत.
View this post on Instagram
वडगाव मावळ मध्ये झालेल्या स्मित कला रंजन नृत्य प्रतियोगिता मध्ये मावळ सर्वश्रेष्ठ प्रदर्शनचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या शालेय योगा स्पर्धेतून राज्यस्तरीय विभागात निवड होऊन खेळणारा आर्यन विकास अरगडे हा मावळमधील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
View this post on Instagram
1) मावळ विभाग सर्वप्रथम क्रमांक
2) पुणे दृतीय क्रमांक
3) पुणे विभागात तृतीय क्रमांक
4) महाराष्ट्र राज्यात विशेष प्राविण्य
5) पुणे विभाग यामध्ये तृतीय क्रमांकावर
तसेच 15 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्हा पातळीवर झालेल्या योग स्पर्धेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते योगासन स्पर्धेतील 6 ते 15 वयोगटातील मुलींमध्ये कुमारी वेदांगी अजय अरगडे आणि कुमार आर्यन विकास अरगडे यांनी द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अधिक वाचा –
– रेल्वेच्या विविध समस्यांबाबत तळेगाव भाजपाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन; अनेक मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद
– जवणच्या घाटात ब्रेक फेल लालपरीचा थरार! बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव