Dainik Maval News : मावळ मतदारसंघाच्या निवडणूक निरिक्षक गार्गी जैन यांनी रविवारी (दि.28) मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी भेटी दिल्या. तसेच वडगाव मावळ, कान्हे, लोणावळा, तळेगाव येथील विविध मतदार केंद्रास त्यांनी भेटी देऊन पाहणी केली.
तहसिलदार कार्यालय वडगाव मावळ स्थित नामनिर्देशन स्विकारण्याच्या ठिकाणी पाहणी केली. तसेच नूतन इंजिीअरिंग कॉलेज येथील स्ट्राँग रूम, मतमोजणी ठिकाणाची पाहणी केली. तसेच पोस्टल बॅलेटच्या कामकाजाची पथकाकडून आढावा घेतला. निवडणुक निरिक्षक गार्गी जैन 2015 बॅच च्या आयएएस असून त्यांचा संपर्क क्रमांक 8446218002 आहे.
मावळ मतदारसंघात एकूण 34 उमेदवारांनी नेले अर्ज –
मावळ विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 2 उमेदवारांना 4 नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आली. तसेच सोमवार पर्यंत एकूण 34 उमेदवारांना 62 अर्जांची विक्री करण्यात आली आहे. यासह सोमवार (दि.28) रोजी नामनिर्देशन सादर /प्राप्त झालेली उमेदवार संख्या 2 असून नामनिर्दशन पत्र दाखल संख्या एकूण 4 आहे.
तसेच सोमवार अखेर नामनिर्देशन सादर /प्राप्त झालेली उमेदवार संख्या 4 असून नामनिर्दशन पत्र दाखल संख्या (एकूण) 11 इतकी आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई – बाबा मतदान करा… मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन
– देवेंद्र फडणवीसांचा आदेश डावलला, बाळा भेगडे यांचा बापू भेगडेंना पाठींबा कायम, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही !
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha