व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्नशील – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

तळेगाव दाभाडे शहरातील सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आजही प्रयत्नशील आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दिला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 12, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Vidhan Sabha independent candidate Bapu Bhegde campaign in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आजही प्रयत्नशील आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दिला.

मावळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी तळेगाव दाभाडेमधील सोसायट्यांना भेटी देत गाठीभेटीवर भर दिला. मतदारांनीही समाजात दुही माजवणाऱ्यांना आम्ही मत देणार नाही, आमचं मत बापूसाहेब भेगडे यांनाच असा विश्वास दिला. रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन बापूसाहेब भेगडे यांनी दिले.

मस्करनिस कॉलनी -2, लीलावती ग्रीन्स, जव्हेरी कॉलनी, लेक पॅराडाईज, कृष्णा आकार, शिक्षक सोसायटी, एंजल हिल्स, मोहर प्रतिमा, संस्कृती अपार्टमेंट, फ्लोरा सिटी, स्वराज नगरी, मावळ लँड, गंगा रेसिडेन्सी, लॅटिस सोसायटी आदी कॉलनींना भेट देत मतदारांना आवाहन केले.

बापूसाहेब भेगडे म्हणाले, की मी तळेगाव नगरपरिषदेत असताना अनेक कॉलनींच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. आगामी काळातही सोसायटीतील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्यालाच मत देण्याचे आवाहन केले. तसेच मावळ विधानसभेचा आश्वासक आणि चौफेर विकास साधण्यावर बापूसाहेब भेगडे यांनी भाष्य केले.

यावेळी महिलांनी औक्षण करीत नक्की विजयी व्हाल, असे आश्वासन दिले. पेढे भरवून स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. सोसायटीधारकांनीही आपण ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहून निवडून आणू, असा शब्द दिला.

मावळच्या पुढच्या ५० वर्षांचा विचार करून सुनियोजित विकासाचा आमचा संकल्प आहे. भूमीपुत्र म्हणून मला परिसराची संपूर्ण माहिती आहे. नगरसेवक म्हणून मी योग्य विकासकामे करून दाखवली आहेत. मावळ तालुक्याचा विकास करण्याचा माझा संकल्प आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha
– ‘ते’ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते त्याचे काय झाले ? – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– मावळ तालुक्यात संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम केलंय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke 


Previous Post

आमदार सुनिल शेळके यांनी खरंच धनगर समाजाचा अपमान केलाय का? कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ही बातमी नक्की वाचा

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर उतरले रस्त्यावर । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Campaign rally of MLA Sunil Shelke in Dehugaon

आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर उतरले रस्त्यावर । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.