व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम केलंय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke

पवळेवाडी, निगडे, आंबळे, मंगरूळ, कातवी येथे आमदार शेळके यांनी साधला जनसंवाद

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha MLA Sunil Shelke interacted with voters in Pavlewadi Nigde Amble Mangrul Katvi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री विठ्ठल परिवार संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी कामशेत येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कीर्तन महोत्सवामुळे तालुक्यात वारकरी संप्रदायाचा वारसा जपला जात आहे. या माध्यमातून संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम केल्याचे समाधान आहे, अशा भावना मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या. आमदार शेळके यांनी आंदरमावळात पवळेवाडी, निगडे, आंबळे, मंगरूळ, कातवी आदी गावांचा दौरा करीत जनसंवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

पवळेवाडी येथील जनसंवाद सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू सांडभोर, ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, सरपंच संदीप शेळके, युवानेते देवा गायकवाड, दिंडी समाजाचे माजी अध्यक्ष रोहिदास महाराज, संजय गांधी निर्धार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, माजी सरपंच रवींद्र पवार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बबन ओहाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, माजी सरपंच गोपाळ पवळे, माजी उपसरपंच देविदास धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘एवढा विकास कोणत्या नेत्याने केला नाही’
ग्रामस्थ प्रगती पवळे म्हणाल्या, “सुनील अण्णांनी पवळेवाडीसाठी बारा कोटी निधी उपलब्ध केला, आमच्या गावात कधी कुठला नेता येऊन विकास केल्याचे मला आठवत नाही.. फक्त सुनील अण्णा एकच आमचा लाडका भाऊ आहे ज्याने हे करून दाखवलंय.”

भात काढणीच्या कामातून तुम्ही आत्ता मला एवढा वेळ देताय, पुढची पाच वर्ष मला पुन्हा संधी दिली तर नक्कीच या वेळेचीही परतफेड करीन, अशी ग्वाही सुनील शेळके यांनी दिली.

निगडे येथील जनसंवाद सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू सांडभोर, ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, सरपंच संदीप शेळके, युवानेते देवा गायकवाड, अनिकेत घुले, सरपंच संदीप शेळके, माजी उपसरपंच रोहिदास महाराज धनवे, निगडे गावचे सरपंच भिकाजी भागवत, उपसरपंच भगवान ठाकर, माजी उपसरपंच गणेश भांगरे, आरपीआयचे प्रवीण साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

भिकाजी भागवत म्हणाले, “सुनीलअण्णा कधी पक्ष बघून भेदभाव करत नाही, माणूस बघून काम करून देतात, आपण पण आता तेच करायचं आहे कोणीही कुठल्याही पक्षाचा असो, विकासाला मात द्या म्हणजेच सुनीलअण्णांना मत द्या.“

निवडणुकीत साथ देणाऱ्यांसाठी विकास कामांची रांग लावू – शेळके
निगडे गावाला सात कोटींपेक्षाही जास्त निधी दिला, पण ज्यांच्यासाठी मी हे केलं तेच पळून समोर गेले आहे, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली. ज्यांच्यासाठी काही केले नाही तेच येथे आहेत. तुम्हाला सांगतो की, आता तुमच्यासाठी विकासकामांची मोठी रांगच लावतो, अशी ग्वाही शेळके यांनी दिली.

  • मोठे प्रकल्प महायुतीमुळे मावळात – शेळके
    आंबळे येथे बोलताना सुनील शेळके म्हणाले, “सुनील शेळकेनी मागच्या ५ वर्षात काय केले, हे तुम्ही स्वतःच पाहिले मी स्वतःच घर भरत नाही बसलो मी काम केली. महायुतीचे सरकार अनेक मोठे प्रकल्प घेऊन आले आहे. आज ह्युंदाई सारखी मोठी कंपनी आपल्या मावळात येतेय, पण काही लोक मात्र म्हणतात की हे प्रकल्प आम्ही घेऊन आलोय….”

मंगरूळमध्ये जंगी स्वागत
जब पुरा विपक्ष एक हो जाए, तो समज लेना की आपना नेता सच्चा है, असे म्हणत मंगरूळ मधील ग्रामस्थांनी सुनील अण्णांवरील विश्वास व्यक्त केला.
सुनील शेळके म्हणाले की, “मी तळेगावात जन्मलो असलो तरी माझी कर्म भूमी हीच दोन-चार गावे आहेत. माझा धंदा इथून सुरू केला, चार पैसे मिळाले तेव्हाच मी समाज कार्य करायला सुरू केली. असाच आशीर्वाद माझ्यावर तुम्ही मायबाप जनतेने ठेवला तर अजून जोमाने पुढील ५ वर्षे काम तर करीत राहीनच, पण संपूर्ण आयुष्यही समर्पित करीन.

कातवीगावात बाळगोपाळांकडून स्वागत
‘वाटीत चिवडा, सुनील अण्णालाच निवडा!’ अशा भन्नाट घोषणा देत कातवी गावात लहान मुलांकडून सुनील शेळके यांचे स्वागत करण्यात आले.
माझी लाडकी बहीण योजना चा अंतर्गत पहिले १५०० मिळत होते आता तेच २१०० मिळतील, मी पण त्याच महायुतीचा भाग आहे. मला पुन्हा निवडून द्या, तुम्हाला सर्व योजनांच लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी राहील, असे शेळके यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– पोलिसांनी जप्त केलेली रक्कम माझ्या व्यवसायाची, विरोधकांनी दबाव आणून कारवाई करण्यास भाग पाडले – सचिन मुऱ्हे
– मावळात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यालयातून 36 लाखांची रोकड जप्त, सोमाटणे येथे मोठी कारवाई । Maval Crime 


Previous Post

महाविकासआघाडीचं ठरलं , भाजपाचे ‘ते’ नेते अडचणीत ! बापूसाहेबांसाठी मविआचे कार्यकर्ते सक्रीय, भाजपा कार्यकर्त्यांचा ‘यू टर्न’

Next Post

‘ते’ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते त्याचे काय झाले ? – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
After Pavan Maval Nane Maval Bapu Bhegde in Andar Maval received big response from voters

'ते' आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते त्याचे काय झाले ? - बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.