Dainik Maval News : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने यंदाही मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता सदर व्याख्यानमाला इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कार्यप्रेरणेचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला’ आयोजित केली जात आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन पुष्प माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या भाषणाने गुंफले जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे असणार आहेत. यासह व्याख्यानमालेत व्याख्याते प्रा. वसंत हंकारे, संजय आवटे यांचीही व्याख्याने होणार आहेत.
व्याख्यानमालेचे यंदाचे १०वे वर्ष असून तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, संस्था पदाधिकारी, व्याख्यानमाला संयोजन समिती, प्राचार्य यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News