पावसाळी सिझन कालावधीत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वाहतुक नियोजन आराखडा तयार करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी IPS सत्यसाई कार्तिक (सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी जुना पुणे मुंबई हायवे रोडवरील कार्ला फाटा ते लोहगड किल्ला पायथा यादरम्यान वाहतुक व्यवस्थापनाबाबतची पाहणी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदरचे वाहतुक व्यवस्थापन पाहणीमध्ये महामार्ग पोलीस चौकी खंडाळा येथील पोलीस उपनिरीक्षक अरूण डोंबे, मौजे कार्ला, भाजे, मळवली, लोहगड येथील सरपंच व पोलीस पाटील तसेच लोहगड येथील लोहगड किल्यावरील पर्यटकांचे वाढते गर्दीचे नियोजनावर चर्चा करण्याकरीता भारतीय पुरात्तव विभागाचे, निकांत कुमार हे हजर होते. ( Measures taken by IPS Satyasai Karthik to avoid traffic congestion on Karla to Lohgad route in Lonavla Rural Police limits )
सदरचे वाहतुक व्यवस्थापण पहाणी दौऱ्याचे दरम्यान कार्ला फाटा येथे नो पार्किंग व डायव्हर्शन बोर्ड लावणे, वाहन चालकांना सुचना देणेकरीता पी.ए. स्टिटम लावणे, रोडचे दोन्ही बाजूने वाहन पार्कींग होणार नाही याकरीता पांढऱ्या पंट्ट्या मारणे, कार्ला फाटा येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे व शनिवार व रविवार या गर्दीचे दिवशी 05 स्वयंसेवक वाहतुक व्यवस्थापनाकरीता देणे ई. सुचना ग्रामपंचायत कार्ला यांना देण्यात आलेल्या आहेत. शनिवार व रविवार गर्दीच्या दिवशी कार्ला फाटा येथे गर्दी होवू नये याकरीता मळवली बाजूकडून येणारी वाहने ही कार्ला गावातून मेन हायवे रोडला पाठविणे इत्यादी नियोजन करण्यात आलेले आहे.
तसेच कार्ला ते मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर असलेले अरूंद पुलावर वाहतुक कोंडी होवू नये, याकरीता दोन्ही बाजुस पोलीस व पोलीस मित्र यांची नेमणुक करून टप्या टप्याने दोन्ही बाजुकडील वाहने सोडणेबाबत चर्चा झालेली आहे. मळवली रेल्वे गेट येथे रेल्वे गेट बंद झाल्यास मोठया प्रमाणावर वाहतुक ठप्प होत असल्याने बोरज बाजूकडून व सदापुर बाजूकडून येणारे रोडवर बंदोबस्त नेमणे तसेच रेल्वे गेटचे दोन्ही बाजूस रोडचे कडेला असलेले हातगाडे व इतर अतिक्रमण काढून घेणे, नो पार्किंग व डायव्हर्शन बोर्ड लावणे, वाहन चालकांना सुचना देणेकरीता पी. ए. स्टिटम लावणे, रोडचे दोन्ही बाजूने वाहन पार्कंग होणार नाही याकरीता पांढऱ्या पंट्ट्या मारणे, मळवली रेल्वे गेट येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, शनिवार व रविवार या गर्दीचे दिवशी 05 स्वयंसेवक वाहतुक व्यवस्थापनाकरीता देणे ई. सुचना ग्रामपंचायत मळवली यांना देण्यात आलेल्या आहेत.
भाजे गावाकडून येणारी वाहतुक ही मळवली रेल्वे गटचे पुर्वीच देवले गावाकडे वळवून देवले – आँढे – ढोली या मार्गाने नवीन पुणे मुंबई हायवे रोडवर पाठवून एकेरी वाहतुक करणे याबात चर्चा झालेली आहे. मौजे भाजे येथे भाजे चौक – नवीन झालेला भाजे धबधबा – भाजे लेणी पायऱ्या यादरम्यान नो पार्किंग बोर्ड लावणे वाहन चालकांना सुचना देणेकरीता पी. ए. स्टिटम लावणे, शनिवार व रविवार या गर्दीचे दिवशी 05 स्वयंसेवक वाहतुक व्यवस्थापनाकरीता देणे ई. सुचना ग्रामपंचायत भाजे यांना देण्यात आलेल्या आहेत.
लोहगड येथे लोहगड किल्ला पहाण्यासाठी मोठया प्रमाणावर पर्यटक येत असल्याने सदर ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये याकरीता भाजे गवाकडून लोहगडाकडे गेलेली वाहने ही परिस्थितीप्रमाणे दुधिवरे खिंड मार्गे लोणावळा बाजूकडे पाठविणे याबाबत चर्चा झालेली असून लोहगडाचे पायथ्यालगत सीसीटीव्ही. कॅमेरा बसविणे, शनिवार व रविवार या गर्दीचे दिवशी 05 स्वयंसेवक वाहतुक व्यवस्थापनाकरीता देणे ई सुचना ग्रामपंचायत लोहगड यांना दिलेल्या आहेत. तसचे लोहगडाचे पायथ्याशी गडावरील गर्दीची माहिती देणेकरीता भारतीय पुरातत्व विभागाकडून एल.ई.डी. स्किन लावणे, सुरक्षारक्षक वाढविणे प्रत्यक दरवाजाचे ठिकाणी सुरक्षारक्षक व पी.ए. सिस्टम ठेवणे. गडावर पी.ए. सिस्टम ठेवणे गडावर जाण्याकरीता तिकीट विक्री करताना त्यावर गडावर थांबण्याचा वेळ नमुद करणे, गडावरील सर्व पर्यटक 5 वा. चे पुर्वी खाली येतील याची दक्षता घेणे, गडावर जाण्यासाठी ज्या ठिकाणी पायऱ्या पढलेल्या आहेत. अशा ठिकाणच्या पायऱ्या दुरूस्त करणे सुक्षारक्षक यांना एकमेकांसोबत संपर्क करण्याकरीता वॉकीटॉकीची व्यवस्था करणे, गडावर असणारे धार्मीक स्थळाचे ठिकाणी स्वतंत्र सुरक्षा रक्षकाची नेमणुक करणे, गडावर असलेल्या धोक्याचे ठिकाणी प्रवेश बंद करणे इत्यादी सुचना भारतीय पुरातत्व विभाग यांना देण्यात आलेल्या आहेत. ( Measures taken by IPS Satyasai Karthik to avoid traffic congestion on Karla to Lohgad route in Lonavla Rural Police limits )
पर्यटकांनी लोहगडावरून भाजेमार्गे परत असताना मळवली-देवले-औंढे या मार्गाचा वापर करावा. तसेच पर्यटकांनी पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून दिलेल्या पर्यायी मार्गाने प्रवास करण्याबाबत लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी आवाहन केले आहे.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत आणि किती आमदार शरद पवारांसोबत? पाहा संपूर्ण यादी
– धक्कादायक! दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा इंद्रायणीत बुडून मृत्यू, इंदोरी पुलाजवळील घटना