समाजसेवेत अग्रेसर असलेल्या भद्राय राजते प्रतिष्ठान ह्यांच्याकडून मावळ तालुक्यातील बेबडओहळ गावात वृक्षलागवड करण्यात आली. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रविवारी वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. ह्यात गावातील काही सहकारी आणि प्रतिष्ठानचे सदस्य ह्यांच्या कल्पनेतून मोकळ्या जागेत निवडक झाडांची लागवड करण्यात आली. ( Medicinal Plants Were Planted In Bebad Ohol Village Of Maval Taluka By Bhadray Rajate Pratishthan )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जवळपास 50 वृक्षांची लावगड करण्यात आली. ज्यात अनेक औषधी वनस्पती आहेत. भद्राय राजते प्रतिष्ठानकडून सातत्याने असे उपक्रम राबवले जातात. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिष्ठानचे सदस्य हे त्यांच्या वेळातवेळ काढून समाजपयोगी कार्य करत असतात. भद्राय राजते फाऊंडेशनच्या माध्यमातून या संपूर्ण ग्रुपने आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत.
वृक्ष वाढीसाठी अनुकूल असलेल्या मावळ तालुक्यातील बेबडओहळ गावात असलेल्या काही स्थानिक तरुण, ग्रामस्थ आणि प्रतिष्ठानचेच सहकारी असलेले गावातील काही सदस्य यांच्या सहयोगाने दिनांक 16 जुलै रोजी हा उपक्रम पार पडला. यावेळी भद्राय राजते फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश शेजवळ यांसह सागर माळी, संदीप मोरे, दत्ता महांदळे, आशिष पायगुडे, ओमकार माळी, प्रमोद मंदीलकर, विशाल सांगडे, धीरज डेरे, मंदार हजारे, योगेश पठारे, रोहन काकडे, तुषार उत्तरकर आदी जण उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगाव स्टेशन महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता दुबे, तर कार्याध्यक्षपदी ‘पारगे’ यांची निवड । Maval Taluka Politics
– वडगाव, लोणावळा शहरात शालेय साहित्य आणि फळे वाटप करून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा