Dainik Maval News : साते ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मिनाक्षी मंगेश आगळमे यांची निवड करण्यात आली. सरपंच संदीप शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी मिनाक्षी मंगेश आगळमे व श्रुती धैर्यशील मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदान घेण्यात आले. मिनाक्षी आगळमे यांना ६ तर श्रुती मोहिते यांना ५ मते मिळाल्याने मिनाक्षी आगळमे यांनी सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले.
निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी सुरेश जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी उपसरपंच आम्रपाली नितीन मोरे, सदस्य गणेश शिवाजी बोऱ्हाडे, ऋषिनाथ मारुती आगळमे, संदीप दिनकर शिंदे, संतोष पोपटराव शिंदे, सखाराम काळोखे, आरती सागर आगळमे, ज्योती मुकुंद आगळमे, श्रुती धैर्यशील मोहिते, वर्षा स्वप्नील नवघणे, माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब आगळमे, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनियुक्त सरपंच मिनाक्षी आगळमे यांचा सत्कार
सत्कारप्रसंगी मिनाक्षी आगळमे म्हणाल्या ग्रामस्थांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला सरपंच पदाचा मान दिला. जो माझ्यावर विश्वास दाखवला व मला गावची व ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल व उर्वरित विकासाची कामे करण्यास मी कटिबद्ध राहील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान