भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत देहुरोड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान यावर मार्गदर्शन केले. तसेच शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाहू शेलार यांचे भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“देहूरोड शहरातील सर्व बूथच्या कार्य समित्या व बूथ कमिटी यादी पूर्ण करून सर्वांनी जास्तीत जास्त सरल ॲप डाऊनलोड करून मोदी साहेबांच्या जनकल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी आजपासून कामाला लागावे” अशा सूचना भेगडे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, नवनिर्वाचित शहराध्यक्ष लहु शेलार, जेष्ठ नेते गुरुमीत सिंग रतू, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष कैलास पानसरे, उपाध्यक्ष रघुवीर शेलार, देहूरोड शहराचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांच्यासह देहूरोड शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, महिला भगिनी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Meeting at Dehu Road for BJP booth empowerment Guidance by Ravindra Bhegade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– उज्जैन प्रकरण: ‘आपला समाज अमानवीय झाला आहे’ – प्रकाश आंबेडकर
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स हवे? आरटीओकडून ऑक्टोबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
– लोणावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह