Dainik Maval News : राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर असून निवडणूक आयोगाच्या सुचना आणि नियमांनुसार निर्विघ्न आणि मुक्त वातावरणात निवडणूका पार पडाव्यात, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. सोमवारी (दि.21) 204 मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदार संघातील वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
वडगाव मावळ पोलीस ठाणे येथे ही बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मायने, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक कुमार कदम, कामशेत पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील उपस्थित होते. पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना आदर्श आचारसंहिता, निवडणुकापूर्वी, निवडणुकीच्या दिवशी व निवडणूक नंतर घ्यावयाची दक्षता याबाबत पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले व योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– फरार आरोपींबाबत वडगाव न्यायालयाचा आदेश जारी । Vadgaon Maval
– भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा
– राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत सुनिल शेळकेंचे नाव असणार, ‘या’ 6 कारणांमुळे अजितदादा शेळकेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देणार