ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात दिनांक 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ( mega recruitment of 19 thousand 460 posts in all zilla parishad maharashtra )
‘माहे मार्च, 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमी व इतर विविध कारणांमुळे परिक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत हि मेगा भरती करण्यात येत आहे’ अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
दिनांक 05 ऑगस्ट, 2023 ते दिनांक 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन दिनांत 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा लागेल. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गिरिश महाजन यांनी सांगितले. ( mega recruitment of 19 thousand 460 posts in all zilla parishad maharashtra )
सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
परिक्षा अत्यंत पारदर्शकता : प्रक्रिया IBPS कंपनीमार्फत
परिक्षेची संपूर्ण प्रक्रिया IBPS कंपनीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे सदर परिक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषास कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, अशी विनंती आहे. सन 2019 पासून परिक्षा झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र भावना असल्याचे मला माहिती आहे. त्यामुळे प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग) यांच्या माध्यमातून वारंवार IBPS तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन हा प्रश्न एकदाचा मार्गी लावलेला आहे.
मार्च, 2019 मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केलेला होता व वयाधिक्य झाल्याने ते परिक्षेस बसण्यास पात्र
ज्या उमेदवारांनी माहे मार्च, 2019 मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केलेला होता व वयाधिक्य झाल्याने ते परिक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना दि.31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.
कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता
ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून दिनांक 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा! पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणूकही लढवणार.. पाहा कोर्टाने काय म्हटलंय?
– पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक
– औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत