Dainik Maval News : इंदोरी येथे “संवाद आपुलकीचा – नात आपुलकीचं” या भावनिक संदेशाने सजलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ) आणि मेघाताई प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदोरी शहर) यांच्या वतीने करण्यात आले.
रविवारी, दि. 26 ऑक्टोबर रोजी प्रशांत दादा भागवत यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गर्दी केली. स्नेह आणि आपुलकीच्या वातावरणात झालेल्या या संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, गणेश खांडगे, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांनी आपला जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी मागणी अर्ज आमदार सुनील शेळके यांच्या कडे सुपूर्द केला, ज्यामुळे या कार्यक्रमाने राजकीय रंगही चढला.
इंदोरी–वराळे गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी मेघाताई भागवत या अत्यंत प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी, स्नेह, आणि एकीचा संदेश देत “आपलेपणाची भावना” कार्यकर्त्यांच्या मनात अधिक दृढ झाली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर



