व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार चुरशीच्या ; इच्छुक उमेदवारांना मिळाला नवा पर्याय । Maval Politics

'मविआ'च्या एन्ट्रीने मावळच्या राजकारणात रंगत !

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 28, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Local body elections New options in Maval taluka through Maha Vikas Aghadi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाल्यापासून मावळ तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पडद्यासमोर अन् पडद्यामागे चर्चेपासून चार हात दूर असलेला ‘विरोधी आवाज’ सोमवारी (दि. २७) अचानक समोर आला. अन् नुसता समोर आला नाही तर निवडणुकीचे रणशिंग फुंकून मोकळाही झाला.

महाविकासआघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस (आय) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष सामील झाले असून या पाचही पक्षांनी मावळ तालुक्यात ‘महाविकासआघाडी’ म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे जाहीर केले आहे.

‘मविआ’च्या या एन्ट्रीमुळे मावळ तालुक्याच्या राजकारणात आणखीन रंगत येणार आहे. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या भोवती फिरत असलेल्या राजकारणाचा परीघ आता आणखीन विस्तारणार आहे. विरोधकांचा एक भक्कम आवाज समोर आल्याने निवडणुका देखील चुरशीच्या होतील.

सर्वाधिक महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडे तिकीटासाठी धाव घेणाऱ्या उमेदवारांना विशेषतः तिकडे तिकिट न मिळालेल्या नाराज उमेदवारांना ‘महाविकासआघाडी’च्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या नव्या पर्यायाचा आता इच्छुक उमेदवारही नक्कीच विचार करतील.

थोडासा मतदारांचा आढावा घेतल्यास मावळ तालुक्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची विचारधार मानणारा एक मोठा वर्ग आहे, हे नाकारता येत नाही. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास मावळ लोकसभेतून निवडून आलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांना सहाही विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक कडवी झुंज ही मावळ विधानसभेत मिळाली होती, हे सत्य आहे.


dainik maval jahirat

Previous Post

मुंबईत विरोध पण मावळात सोबत ! काँग्रेस (आय) आणि मनसे मावळ तालुक्यात महाविकासआघाडी म्हणून निवडणूक लढविणार

Next Post

आपुलकीचा संवाद साधत मेघाताई भागवत यांनी आमदार सुनील शेळकेंकडे सुपूर्द केला इंदोरी-वराळे गटासाठीचा उमेदवारी अर्ज

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Megha Bhagwat handed over nomination paper for Indori Varale group to MLA Sunil Shelke

आपुलकीचा संवाद साधत मेघाताई भागवत यांनी आमदार सुनील शेळकेंकडे सुपूर्द केला इंदोरी-वराळे गटासाठीचा उमेदवारी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.