मोहितेवाडी (ता. मावळ) येथे नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरही आयोजित करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मनसे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, महिला सहायक समिती अध्यक्षा अर्चना म्हाळसकर, तानाजी तोडकर, सखाराम काळोखे, प्रदीप मोहिते, श्रुती मोहिते, अनिल मोहिते, झुंबर आप्पा उभे, दतात्रय मालपोटे, श्याम मालपोटे, गणेश मालपोटे, जयंत कुंभार, ऋतिक मालपोटे, सोमनाथ मोहिते, अनिकेत काळोखे, प्रतीक मालपोटे विनायक काळोखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ( Meritorious students of class 10th and 12th board exam honored by MNS at Mohitewadi Maval )
‘कुठल्या ठिकाणी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्राविण्य मिळवू शकतो, उत्तम यश संपादन करू शकतो. अभ्यासातील सातत्य हेच चांगल्या यशाचे गमक आहे. शिक्षण घेताना अनेकदा अडचणी येतात, परंतू त्यांनाही धैर्याने सामोरे गेले पाहिजे,’ असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी अरुण म्हाळसकर यांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामभाऊ मालपोटे यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन महाराष्ट्र सैनिक गणेश हिरामण मालपोटे आणि जयंत उत्तम कुंभार यांनी केले होते. मोहितेवाडी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला असे जयंत कुंभार यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– शिळींबमधील ‘अंजनवेल’ येथे ‘द्रौपतीमाला पुष्प’ फुलांना बहर ! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 22 कोटींची विकासकामे…
– कार्ला – भाजे लेणी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, आयएनएस शिवाजी आदी ठिकाणी कैवल्यधाम योग संस्थेमार्फत योग प्रशिक्षण शिबिर