व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval News

मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Women-Crime

Photo : Violence against women and financial fraud


मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (दि. 26 मे) सायंकाळ ते सोमवार (दि. 27 मे) रात्री 1 वाजेच्या दरम्यान हा प्रकार गोडुंब्रे येथील पवना नदीच्या पुलावर घडला. याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

याप्रकरणी 16 वर्षाच्या पीडीत मुलीने शिरगाव पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी पवनकुमार आयोध्या प्रसाद (वय-23 मुळ रा. रामपुर बेला, ता. पट्टी जी. प्रतापगढ, उत्तर प्रदेश), दिपक गोबरी यादव (वय-21 मुळ रा. फतेहपुर भटौली, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) आणि 39 वर्षीय महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. ( minor girl was stabbed with sharp weapon after her rejection of prostitution shocking incident in Maval taluka )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक यानी पीडितेशी प्रेमसंबंध तयार केले. त्यानंतर पवनकुमार व महिला आरोपीने तिच्याकडे देहविक्रीची मागणी केली. पीडीतेने देहविक्रीसाठी नकार दिला. त्यामुळे त्यांनी तिला मूळगावी सोडण्याचा बहाणा करून दुचाकीवर आधी लोणावळ्याला नेले आणि नंतर पुन्हा सोमाटणे जवळ आणले. तिथे महिला आरोपीच्या खोलीत ठेवले.

त्यानंतर आरोपी पवनकुमार याने सोमवारी सायंकाळी त्याच्या दुचाकीवरुन तिला गोडुंब्रे येथील पवना नदीच्या पुलावर आणले. तिथे त्याने आणि महिला आरोपी यांनी मिळून मुलीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला, तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेने तेथून आपली सुटका करून घेत थेट पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तीन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोउपनी पारखे करत आहेत.

अधिक वाचा –
– तळेगावच्या आठवडे बाजारात सोनसाखळी चोरीचा प्रकार, मुलीच्या प्रसंगावधानाने चोराला पकडण्यात यश । Talegaon Crime
– मावळात 4 जून पूर्वीच उधळला गुलाल ! पाटण गावच्या सरपंचपदी ‘यांची’ बिनविरोध निवड । Maval News
– मावळात मुलांपेक्षा मुलीच हुशार ! दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात मुलींनीच मारली बाजी । SSC Result Maval Taluka


Previous Post

मळवंडी ठुले येथे खरीप हंगाम शेतकरी सभा संपन्न; शेतकऱ्यांना गादीवाफा रोपवाटिका, चारसूत्री भातलागवड, बिजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन

Next Post

महत्वाची बातमी ! तळेगावकरांची होणार गैरसोय, गुरुवारी ‘या’ ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Water-shut-off

महत्वाची बातमी ! तळेगावकरांची होणार गैरसोय, गुरुवारी 'या' ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.