मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांसमवेत आमदार सुनिल शेळके यांनी पणन संचालक विनायक कोकरे यांची पुणे येथील कार्यालयात भेट घेतली.
यावेळी झालेल्या बैठकीत मावळ बाजार समितीचे नवीन कार्यालय बांधणे, व्यापारी गाळे बांधणे, लिलावासाठी हॉल बांधणे आणि इंदोरी येथे जनावरांच्या उपबाजार आवारासाठी गायरान जागा उपलब्ध करणे इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर बैठकीस जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, सहकार महर्षी माऊली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती संभाजी शिंदे, उपसभापती नामदेव शेलार, संचालक दिलीप ढोरे, विलास मालपोटे, साहेबराव टकले, नथु वाघमारे, माऊली वाळुंज, बंडु घोजगे, अमोल मोकाशी, शिवाजी असवले आदी उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke and all Director of Maval Bazaar Samiti met Marketing Director Vinayak Kokre )
अधिक वाचा –
– पाटण ते बोरज रस्त्यासाठी आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून 7 कोटी 60 लाखांचा निधी, रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
– कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी; वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे निर्णय