महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील डोंगरगाव-कुसगाव, डोणे-आढले, कार्ला, खडकाळा, पाटण आणि 8 गावांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दिनांक 28 मार्च) वडगाव मावळ येथे संयुक्त आढावा बैठक घेतली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनांची संथ गतीने कामे सुरु आहेत. योजनांच्या कामांमध्ये अनेक अडचणी येत असून काही तक्रारी, समस्या आहेत. आमदार शेळकेंनी याबाबत माहिती घेतली. सदर पाणी योजनांची कामे पूर्ण झाल्यास गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळणार असून अनेक वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवरील ज्या समस्या असतील त्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी समन्वय साधून सोडवण्याचा प्रयत्न करावा. प्रलंबित असलेल्या कामांना गती देऊन कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना आमदार शेळकेंनी दिल्या आहेत. ( MLA Sunil Shelke Held Review Meeting At Vadgaon For Regional Water Supply Schemes Of Villages In Maval Taluka )
अधिक वाचा –
– वराळे इथे हनुमान मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण समारंभ संपन्न
– कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने आढले खुर्द येथील भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव संपन्न, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा विशेष सत्कार