पद्मश्री डॉ. बालाजी तांबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बालाजी तांबे फाउंडेशनच्या वतीने कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर आणि श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन गुरुवार (19 जानेवारी) रोजी करण्यात आले. तसेच, स्व. गीता एन. सैनानी, कै. शांताबाई हरिभाऊ वायकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत पाणपोईचा ( panpoi ) भूमिपूजन समारंभ देखील करण्यात आला. मावळचे आमदार सुनिल शेळके हे यावेळी प्रमुख पाहूणे आणि उद्घाटक म्हणून उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Inaugurated Computer Room Given By Balaji Tambe Foundation To School At Karla )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, मॅनेजिंग डायरेक्टर आत्मसंतुलन व्हिलेज सुनील तांबे, डायरेक्टर डॉ. मालविका तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, मा. पं. स. सदस्य दिपक हुलावळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, कार्ला सरपंच दिपाली हुलावळे, माजी जि. प. सदस्य भरत भाई मोरे, उपसरपंच श्री. किरण हुलावळे, सदाशिव सप्रे, सोनबा गोपाळे गुरुजी, विलास बडेकर, बाळासाहेब भानुसघरे, गणपत भानुसघरे, सुहास गरुड, संजय बावीस्कर, सुनील वाळुंज, संजय जाधव, प्रवीण तिकोणे, प्राचार्य कैलास पारधी, कैलास हुलावळे, सदस्य उज्वला गायकवाड, भारती मोरे, वत्सला हुलावळे, सोनाली मोरे, अभिषेक जाधव, सनी हुलावळे, सचिन हुलावळे, शिक्षक वृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेन शाळेत पवनमावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन
– स्तुत्य उपक्रम! कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीकडून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला 7 लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट