व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळकेंकडून आंदर मावळातील विकासकामांची पाहणी; कामे लवकर पूर्ण करुन नागरिकांना दिलासा देण्याच्या सुचना

आमदार सुनिल शेळके यांनी बुधवारी ( दिनांक 14 जून 2023) अधिकारी आणि सहकाऱ्यांसमवेत आंदर मावळमधील इंद्रायणी नदीवरील नवीन पुल आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 15, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
mla-sunil-shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


आमदार सुनिल शेळके यांनी बुधवारी ( दिनांक 14 जून 2023) अधिकारी आणि सहकाऱ्यांसमवेत आंदर मावळमधील इंद्रायणी नदीवरील नवीन पुल आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

1. टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाची व त्याला पर्यायी जोड रस्त्याची पाहणी केली. कान्हे- टाकवे मार्गावर औद्योगिक प्रकल्पांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येथील दळणवळणाचा हा एक मुख्य मार्ग असल्याने उर्वरित काम त्वरित मार्गी लावण्याच्या सुचना आमदार शेळकेंनी संबंधितांना दिल्या. ( mla sunil shelke inspected ongoing development works in andar maval )

2. घोणशेत ग्रामपंचायत हद्दीतील लंकेवाडी येथे भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या अनेक वर्षांपासून लंकेवाडीकडे येणारा पाणंद रस्ता स्थानिक शेतकऱ्यांच्या वादविवादामुळे बंद असल्याने सदर रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांसह समक्ष पाहणी केली. स्थानिक पातळीवरील वाद सामंजस्यातुन मिटवुन रस्ता खुला करणेबाबत विनंती केली असता सदर शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली असून लवकरच लंकेवाडीचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

3. वडेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर असून सद्यस्थितीत सदर इमारतीच्या दोन स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक बाबींमध्ये सुधारणा करीत उर्वरित कामास गती देण्याच्या दिल्या.

4. आंदर मावळातील वाहतुकीसाठी अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या वडेश्वर ते कशाळ या रस्त्यावरील नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली. या पुलामुळे येथील वाहतूकीचे अंतर बरेचसे कमी होणार आहे.

प्रामुख्याने कान्हे -टाकवे आणि वडेश्वर – कशाळ दरम्यानचा पुल येत्या 15 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी युद्धपातळीवर कामास प्रारंभ करावा, अशा सुचना आमदार शेळकेंनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पवनमावळातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर
– आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा


Previous Post

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या जन्मदिनी देहूरोड शहर शाखा कार्यालयाचे उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mns-dehuroad-pune

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या जन्मदिनी देहूरोड शहर शाखा कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.