देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध कामांचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दिनांक 13 जानेवारी) संपन्न झाली. यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पाणीपुरवठा, वाढीव टॅक्स आकारणी, पी.पी.अॅक्ट नोटीस, कामांची सद्यस्थिती, अतिक्रमण कारवाई आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच बाजारपेठ परिसरात अधिकाऱ्यांसमवेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
किन्हई, चिंचोली, झेंडे मळा या भागातील पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी लवकरात लवकर कामास सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, बोर्ड हद्दीतील मिळकतींचे अवास्तव करपात्र मुल्य वाढ रद्द करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार सुनिल शेळके यांनी दिले. ( MLA Sunil Shelke Reviewed Development Works In Dehurod Cantonment Board Area )
यावेळी आमदार शेळके यांच्यासमवेत, मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, प्रशासक कैलास पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा अरुणा पिंजण, मा नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तु, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, कृष्णा दाभोळे, बाळासाहेब जाधव, युवक अध्यक्ष आशिष बन्सल, तानाजी काळभोर, अतुल मराठे, किशोर गाथाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत लढवली ना? मग हिशोब सादर करा, 20 जानेवारीपर्यंत हिशोब सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार
– अवैध मद्य विक्री आणि अवैध मद्य सेवन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम, पुणे जिल्ह्यात 29 गुन्ह्यांची नोंद । Pune District News