Dainik Maval News : लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट, लोणावळा शहर पत्रकार संघ, लोणावळा पोलीस व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प नशा मुक्ती (Drugs Free Lonavla)’ या सामाजिक चळवळीचा प्रारंभ व माहिती पत्रकाचे अनावरण संपन्न झाले. आमदार सत्यजित तांबे, मावळचे आमदार सुनील शेळके, आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नशामुक्ती संदर्भात करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारत तरुणांचं देश आहे, पण तरुणांना योग्य दिशा मिळाली नाही, तो भरकटला तर त्याचा परिणाम वाईट होतो, ज्याचा अनुभव आपण बांगलादेश मध्ये सध्या जे चालले आहे त्यातून घेत आहे. त्यामुळे योग्य वयातच तरुणांना, त्यांच्या उत्साहाला, त्यांच्या क्रयशक्तीला योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. ( MLA Sunil Shelke Satyajit Tambe unveiling Sankalp Nasha Mukti campaign information sheet in Lonavala )
सामाजिक भान जपत सुरु केलेली ही चळवळ नक्कीच आदर्शवत आहे. चळवळीत आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत. सध्याची तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत असून ही अतिशय गंभीर बाब आहे. देशाची तरुण पिढी निरोगी, सुदृढ असेल तरच देश सशक्त होऊ शकतो. प्रशासन, पालक व समाजातील जागरुक नागरिक या नात्याने आपण अशा समस्येचा समुळ नाश करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे. या समस्येच्या चळवळीमध्ये सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. व्यसनाच्या आहारी जाण्यापासून तरुणाईला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या युवा पिढीला रोखण्याचे आव्हान आपल्या यंत्रणांसमोर देखील आहे. मागील काही महिन्यांपासून स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाई करत कठोर पावले उचलली याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. – आमदार सुनिल शेळके
यावेळी लोणावळा काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सचिव ऍड. निलिमा खिरे, सहसचिव ऍड. अजय भोईर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे, जयहिंद लोकचळवळीचे शहराध्यक्ष चैतन्य वाडेकर, विशाल विकारी, जकीर खलीपा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांनो… बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी आता १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज
– मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय ! राज्यातील ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार, केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार
– सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेची घोषणा, 31 ऑगस्टपूर्वी करा अर्ज, वाचा अधिक