Dainik Maval News : सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. मंगळवारी (दि. 17) श्री गणरायाचे विसर्जन होणार असून सर्वत्र विसर्जन मिरवणूकीची तयारी झाली आहे. मावळ तालुक्यात साधारणपणे सात दिवसांचे गणपती असतात. त्यामुळे सातव्या दिवशी गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर पुणे, मुंबई शहरातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात असतात. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनीही नुकतेच दगडुशेठ गणपती आणि लालबागचा राजा या प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी रविवारी (दि.१५) पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि मनोभावे आरती देखील केली. तसेच लालबागच्या राजाच्या चरणी देखील आमदार शेळके यांनी सपत्निक मस्तक टेकविले. गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे आमदार शेळके यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी लालबागचा राजा गणेश ट्रस्टच्या वतीने आमदार शेळकेंचा सन्मान करण्यात आला.
अधिक वाचा –
– गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे
– बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News